शेअर मार्केट बेसिक्स – भाग २ : मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर व रिस्कचे प्रकार मित्रांनो, आपण या भागात, मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर, व मार्केटमधील रिस्क याबद्दल माहिती घेऊ: रोखे बाजारात व्यवहार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा स्टॉक एक्स्चेंज, क्लियरिंग कॉर्पोरेशन्स, डिपॉजिटरी याद्वारे पुरविल्या जातात, या संस्थांना ‘मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इंस्टीट्यूशन्स’ म्हटले जाते. स्टॉक एक्स्चेंज: स्टॉक एक्स्चेंज हे पूर्ण देशभर संगणक आधारित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पुरवितात, ज्याद्वारे त्यांच्या नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर्सच्या मध्यस्थीने शेअर्सची खरेदी-विक्री करता येते. ही खरेदी विक्री एका निश्चित किंमतीला व न्याय्य रीतीने पार पडते. BSE लिमिटेड, NSE लिमिटेड, मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्स्चेंज (MSE) हे देशभर उपलब्ध असलेले मुख्य स्टॉक एक्स्चेंज आहेत. क्लियरिंग कॉर्पोरेशन्स: स्टॉक एक्स्चेंजवर झालेल्या