एक अधुरे स्वप्न

शाळेत असताना एक गाणं खूप गाजलं होतं – "ए नजमीन सुनो ना", ‘दिल ही दिल में’ या चित्रपटातलं.ते गाणं अजूनही लक्षात आहे... पण त्याचं खरं कारण? सोनाली बेंद्रे!त्या काळात गाण्याचे बोल आणि संगीत यामुळे गाणी अजरामर झाली आहेत आणि कितीही ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. आणि त्या गाण्यातली सोनाली बेंद्रे – यांना कोण विसरणार?त्या गाण्यात कुणाल सिंगही होता, पण त्याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं असेल असं वाटत नाही… विशेषतः मुलांचं. मी तो चित्रपट आजतागायत पूर्ण पाहिलेला नाही. पण हे गाणं मात्र रविवारी दुपारी दूरदर्शनवरील गाण्यांच्या कार्यक्रमात किंवा 'चित्रहार' या कार्यक्रमात हे गाणं लागत असायचं. पण छतावर जाऊन अँटेना फिरवायला