आज सकाळीच मी माझं आवरून ऑफिस साठी निघाले . ट्रेन अगदी वेळेवर आली होती आणि मी नेहमीप्रमाणेच धावत पकडली होते. मी धावत आल्यामुळे मला धाप लागली होती , मी आतमध्ये जाऊन एक मुली शेजारी डोळे बंद करून बसले होते . हा ! पण डोळे मिटून म्हणजे झोपले नव्हते हा ! मी अचानक मध्येच हसू लागले जसं काही विनोदी स्वप्न पडलं होतं. पण तसं काही नव्हतं तर मी माझ्या बाजूला बसलेल्या मुलीचे शब्द ऐकून हसत होते जे मी गेले पंधरा मिनिटापासून दुर्लक्ष करत होते ! मी त्या मुलीचे बोलणं लपून ऐकत होते असं नाही तर ती अश्या प्रकारे बोलत होती