सरकारी नोकरी - 11

  • 78

************ ११ ********************           प्रभास व सृष्टी भारत देशातील रहिवाशी. तसा नेपाळ हा शेजारील देश होता. नेपाळमध्येही अराजकतेच्या कारणावरुन संघर्ष झाला होता व नेपाळमधील सत्ताधारी असलेल्या लोकांची घरं नेपाळमधील जनतेनं जाळून टाकली होती. त्यातच नेपाळमधील सत्ताधारी लोकं मरणाच्या भीतीनं देश सोडून पळून गेले होते. त्यातच प्रभास व सृष्टीला वाटत होतं की नेपाळकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. भारताचीही सध्याची स्थिती तशीच आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात त्यांनी टेट परिक्षा आणली आहे. शिक्षकांचा रोजगार हिरावणे सुरु आहे. लोकांचाही रोजगार हिरावणे सुरु आहे. लोकांनाही कामधंदे नाहीत. हं, सरकार, मजूर, गोरगरीब लोकांना मोफत धान्य नक्कीच देतं. परंतु त्यातून लोकं आळशी बनत चालले