सरकारी नोकरी - 9

  • 111

***************** ९ **************************          टेटची ती परिक्षा. ती येण्यापूर्वीच शाळेशाळेत गोंधळ होता. शाळाशाळांमध्ये शैक्षणिक गोंधळ माजला होता. शिक्षकांना शासन सुखानं जगू देत नव्हतं. निव्वळ शासनच नाही तर खाजगी शाळेतील संस्थाचालकही सुखानं जगू देत नव्हता. तो देण म्हणून शिक्षकांच्या रकमेतून पैसे घेत होता. आपली गुंडगीरी दाखवत होता. ऑनलाईन कामानं तर शिक्षकांचं कंबरडं मोडलं होतं. त्यातच सरकार निवडणूक आणि इतर बऱ्याच गोष्टीची कामंही शिक्षकांच्या मागं लावत होते. जसा शाळेचा सृष्टीला त्रास होत होता. तसाच त्रास प्रभासलाही होत होता. त्यामुळंच सृष्टीच्या मनात जे विचार येत होते. तेच विचार प्रभासच्या मनात यायचे. एक दिवस अमेय प्रभासला जेव्हा भेटला. तेव्हा प्रभासनं शाळेबाबतची