सरकारी नोकरी - 8

*********** ८ ***************************          सृष्टीला शालार्थ आयडी घोटाळ्याची चिंता होती. तसे तिच्या नोकरीला तब्बल सात आठ वर्ष झाले होते. तशी तिला नोकरीही उशिराच लागली होती.            सृष्टीला लागलेली शालार्थ आयडी घोटाळ्याची चिंता. मोठमोठे अधिकारी पकडले जात होते. अशातच त्याची गाज शिक्षकांकडे फिरली. ज्यात सृष्टी सापडली. त्यातच तिची सुनावणी झाली व सुनावणीदरम्यान सृष्टी दोषी आढळली व तिची नोकरी गेली.परंतु तिला सारखं वाटत होतं, दोष आपला नाही. दोष आहे संस्थाचालकाचा. त्यांनी आपल्याला नोकरी दिली. हे खरं असलं तरी त्या नोकरीची मान्यता तिनं गैरव्यवहार करुन घ्या म्हटलेलं नाही. तसं संस्थाचालकानं तिला शाळेत घेतलं. त्याची दोन कारणं होती.