******************** ७ *********************** दगड माती देवच आहेत आपल्यासाठी. याबाबत एक व्हिडिओ आला फेसबुकवर. दगड, माती देवच. तसं पाहिल्यास उच्च शिक्षीत लोकंही आज दगड, मातीच्या देवाची पुजा करु लागले आहेत व हे प्रमाण वाढलेले आहे. ज्यात चमत्कार होतो व लाभ मिळतो. असं प्रभासचं म्हणणं होतं. 'उच्च शिक्षण...... म्हणतात की शिक्षणानं ज्ञान येतं. माणसं सुशिक्षित होतात. परंतु ते सर्व बोलणं वायफळ वाटतं. कारण लोकं कितीही सुशिक्षित झाले असले तरी ते अंधश्रद्धेतच गुरफटलेले असतात. यावरुन शिक्षण कशाला म्हणायचं आणि शिक्षण का बरं घ्यायचं? हा प्रश्न त्याचेसमोर उभा होता. उच्चशिक्षीत अंधश्रद्धा याचा अर्थ देव दगड, मातीत