*********** ६ *********************** आरक्षण........ इतर समाजाला असलेलं आरक्षण. आरक्षण असल्यानं तथाकथित समाज पुढे गेला होता. तो भरपूर शिकला होता व नोकरीला लागला होता. त्या समाजात बराच असा बदल झाला होता. मात्र तो समाज शिकलेला असला तरी वा उच्चशिक्षीत झाला असला तरी त्यांच्यातील संस्कार तुटले होते. प्रभासचा मित्र अमेय हा ओपन प्रवर्गातून होता व त्याच्या समाजाचा असा कोणताच लढा नव्हता की त्याच्या समाजाला आरक्षण मिळेल. त्यातच आरक्षणावरुन त्याच्या मनात नित्यनेमानं आरक्षणविरोधी विचार येत. त्याला वाटत होते की हे असं आरक्षण नकोच द्यायला. कारण आरक्षणानं देश कमजोर होत आहे व संस्कार तुटत