********************** ४ ************** शालार्थ आयडी घोटाळा अभियान यशस्वी होईल काय? सृष्टीला याबाबत विचार यायचा. विचार यायचा की हे जर अभियान यशस्वी झालं तर माझी नोकरी जाईल आणि मी कायमस्वरुपी नोकरीला मुकेल. तिला ही चिंता नव्हती की तिचे पैसे जाणार नाहीत. पैसे तर त्या शाळेतील संस्थाचालकाचेच जातील. परंतु नोकरी गमावण्याचं दुःख तिला होतं व ते दुःख तिला सतत जाणवत होतं. त्यातच त्या शालार्थ आयडी घोटाळ्यातून तिचं वेतनही बंद झालं होतं. प्रभासचा आणखी एक मित्र होता. ज्याचं नाव होतं अमेय. अमेय हा देखील शिकलेला होता. परंतु त्यालाही आरक्षण नव्हतं व त्याचा