सरकारी नोकरी - 2

*************** २ *************************                       सृष्टी प्रेम करीत होती नोकरीवर. तिला वाटत होतं की सरकारी नोकरी लागावी. ज्यातून तिनं जे आजपर्यंत भोगलं. त्या यातनेतून मुक्ती मिळेल. तशी ती फार शिकली होती व देशात तिच्या समाजाला आरक्षण असल्यानं तिला शिकता आलं होतं. त्यातच नोकरीतही आरक्षण होतंच. तसं पाहिल्यास लवकरच तिला नोकरी लागली होती.          प्रभास हा सृष्टीच्याच वर्गातील एक मुलगा. गावातच राहणारा. तोही बराच शिकला होता. परंतु त्याच्या समाजाला आरक्षण नव्हतं. त्यामुळं त्याला लवकर नोकरी लागली नाही. त्यासाठी त्याला प्रतिक्षाच करावी लागली बराच काळ. तद्नंतर त्यालाही नोकरी लागलीच.