सरकारी नोकरी - 1

सरकारी नोकरी या पुस्तकाविषयी         सरकारी नोकरी नावाची माझी एकशे अकरावी पुस्तक आणि एक्यांशिवी कादंबरी. ही कादंबरी वाचकांना देतांना अतिशय आनंद होत असून यात दोन शिक्षकाची दयनीय अवस्था वर्णीत केल्या गेली आहे. म्हणतात की शिक्षण खातं चांगलं आहे. परंतु शिक्षण नावाच्या पवित्र खात्यात कोणता त्रास होतो? याचं वर्णन यात आहे.            कादंबरी तसं पाहिल्यास जास्त वाचाविशी वाटणार नाही. कारण सत्य परिस्थिती लोकांना वाचणं आवडत नाही. ती कंटाळवाणी वाटते. परंतु अशीही शिक्षकांच्या जीवनाची दुरावस्था राहू शकते काय? याचा बोध या कादंबरीतून होतो. याव्यतिरिक्त या कादंबरीत मराठ्यांच्या आरक्षणाबाबत थोडासा भाग आणल्या गेला आहे. हा भागही तेवढीच मराठ्यांची