Chapter 11 : मुळांखालचं सत्य प्रियंका शांत होती , पण तिचा चेहरा निर्धाराने भारलेला. शंकरनाथने तिच्या हातात एक लाल धागा आणि एक छोटंसं गंगाजल दिलं. “हे तुला झाडाच्या मुळांपर्यंत घेऊन जाईल ... पण लक्षात ठेव , जे काही दिसेल, त्यावर विश्वास ठेव... तेच सत्य असेल.” गावकऱ्यांच्या विरोधात आणि साऱ्यांच्या संशयाच्या नजरा झेलत प्रियंका एकटीच निघाली झाडाच्या दिशेने. चंद्राच्या उजेडात झाडाचं रेखाटन अधिक भेसूर दिसत होतं. वाऱ्याची एकही झुळूक नव्हती, पण झाडाच्या पानात सतत कुजबुजत असल्यासारखी कंपने ऐकू येत होती. मुळांच्या जगात प्रवेश प्रियंकाने विधीप्रमाणे झाडाभोवती एक त्रिकोण आखला आणि त्याच्या मध्यभागी बसून ध्यान सुरू केलं. काही मिनिटांतच तिच्या आजूबाजूचं