पुनर्मिलन - भाग 11

त्या रात्री सतीश परतलाच नाही आता परत तो दारू ढोसून येतो आहे की काय असे ऊमाला वाटले  त्या रात्री ऊमा न जेवता सतीशची वाट पहात राहिली होती  ..पण सतीश आलाच नाही. सकाळी उठल्यावर तिने आधी स्वतःचे आणि नयनाचे आवरून घेतले .तिचे डोळे खरेतर सतीशच्या येण्याकडे लागले होते .पण तिची निराशा झाली ..अखेर ती घराला कुलुप लावून नयनाला घेऊन बाहेर पडली नयनाला नेहेमीसारखे काकुकडे सोडले .बहुतेक वेळेस नयनाला काकुकडे सतीश सोडत असे .त्यामुळे काकूने विचारले सतीश कसा आला नाही असे ..ऊमाने काहीतरी थातूर मातुर सांगून वेळ भागवली आणि ती तेथून बाहेर पडली .काका काकूंना सतीशबद्दल हे काही सांगण्यात काहीच अर्थ नव्हता .मग तिने तिच्या ऑफिसमध्ये