पुनर्मिलन - भाग 10

  • 183
  • 63

त्यातल्या त्यात एक गोष्ट ऊमाला बरी वाटायची ती म्हणजे त्यांच्या घराच्या आजूबाजूला कोणीच राहणारे नसल्याने घरातला नेहेमी होणारा सतीशचा आरडाओरडा आणि दंगा कुणाला कळायचा प्रश्न नव्हता .आता ऊमाने ठरवले ऑफिसला जायला सुरवात करायची काकूने पण तिच्या ऑफिसच्या वेळात नयनाला संभाळायची जबाबदारी घेतली आणि ऊमाचे ऑफिस रुटीन सुरु झाले अजुन तरी ऊमाने काका काकुना याची काहीच कल्पना दिली नव्हती सतीश कधी घरी यायचा कधी नाही हे घडणारे सगळे कमी पडले म्हणून की काय... एक दिवस एक वृध्द गृहस्थ संध्याकाळी दारात उभे राहिलेले दिसले  .ऊमा नुकतीच ऑफिसमधून आली होती . येताना काकूकडून नयनाला घेऊन आल्यामुळे कडेवर नयना आणि हातात पिशवी आणि पर्स होती  .नयनाला आधी खाली उतरवून तिने पर्समधून किल्ली काढून  घराचे कुलूप