ऊमाच्यापुनर्मिलन भाग ९ ऊमाच्या बाळंतपणाची वेळ जवळ आल्यावर काका स्वतः घरी येऊन तिला घेऊन गेले .ऊमाच्या अशा अवघडल्या अवस्थेत तिला आरामाची गरज आहे .तिला स्वतःच्या घरी कामाच्या व्यापामुळे आणि नोकरीमुळे तिला आराम मिळणार नाही .अशा विचाराने काकूने स्वतः काकांना पाठवले होते ऊमाला घेऊन यायला त्यावेळेस मात्र सतीशने सज्जनपणाचा“बुरखा” घेतला होता .आणि अगदी नाईलाजाने तिला माहेरी जायला परवानगी देत आहे ..त्याला तिच्याशिवाय अजिबात करमत नाही असे दाखवले .काकांची खरेतर ऊमाच्या बाळंतपणाचा खर्च करायची ऐपत नव्हती पण ऊमाचे पहिले बाळंतपण आपल्याकडे करायची त्या दोघांना हौस मात्र होती. काकांच्या सोबत ऊमा आपले जुजबी सामान घेऊन काकांच्या घरी राहायला गेली .तिथूनच ती नोकरीला जायला लागली .सतीश दिवसाआड तिची