पाचवा अध्याय------------------"कालचक्र"------------------आर्यनने सावकाश डोळे उघडले. एक कडक, भाजून निघालेली उन्हं त्याच्या चेहऱ्यावर पडली.तो उठून उभा राहिला आणि आजूबाजूला पाहू लागला. जमीन राखाडी, फाटलेली होती. हवेत धुळीचा वास होता. सभोवताली कोणीही नव्हते. फक्त एक जुना, कोसळता वाडा आणि एक ओस पडलेला घाट होता.पण हा विश्रामबाग घाट नव्हता. हवा, प्रकाश, सगळं काही वेगळं होतं. जणू काळाचा रंगच फिका पडला होता. तो मागे वळला. सिंक्रोनायझेशन चेंबर नव्हती. त्याऐवजी एक तंबू होता, ज्यामध्ये जुन्या काळाची, विचित्र यंत्रं दिसत होती. त्याच यंत्रांचे प्राथमिक रूप.तो १९४७ मध्ये होता. पण कुठे? त्याने पुस्तक काढून पाहिले. ते अजूनही त्याच्या खिशात होते.तेवढ्यात, एक आवाज ऐकू आला."कोण आहे तिथे?"एक माणूस तंबूतून बाहेर