तिसरा अध्याय-------------------"घाटातील सावल्या"-----------------------विश्रामबाग घाट. पुण्याच्या गर्दीत दडलेले एक ओस पडलेले, विस्मृतीच्या धुक्यात हरवलेले ठिकाण. जुन्या विटा, कोसळणाऱ्या कठड्यांवरची शेवाळची थर हिरवट अंधुक पसरलेली होती. इतिहासाचा एक सन्नाट अतिशय शांत कोना होता.आर्यन त्याच्या SUV मधून बाहेर पडला. त्याने जीन्स आणि एक डार्क जॅकेट घातल होत, पाकिटात तो जुना नकाशा दाबून ठेवला होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते.क. व. म. म्हणजे काय? ते कोण आहे? आणि त्यांनी त्याला इथे का बोलावले?इतक्यात त्याचा फोन वाजला. तन्वी होती."दादा, तू कुठे आहेस? बाबा-आई आले आहेत. तू खरंच त्या समीकरणासाठी बाहेर गेलास का?"तिच्या आवाजात चीड आणि काळजी होती."हो,तनू. मला... मला इन्स्टिट्यूटसाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट एका