दुसरा अध्याय -----------------"प्रतिध्वनी"-------------------आर्यन टेबलावर बसला.त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता...."हे काय होत? संदेश? की भ्रम? "पण आत खोलवर त्याला ठाऊक होत - हे भ्रम नव्हत. कुणीतरी....किंवा काहीतरी, त्याच्या प्रयोगाला प्रतिसाद देत होत....आर्यनचा श्वास अडखळला. तो पुन्हा एकदा स्क्रीनकडे पाहू लागला, पण ती आता पूर्णपणे सामान्य होती. फक्त सिस्टम डायग्नोस्टिक्स आणि स्टँडबाय मोडमधील नीटनेटके आलेख त्याला दिसत होते. पण त्या क्षणाची छाप त्याच्या मनावर कोरली गेली होती. ती धूसर आकृती... ते डोळे... आणि तो संदेश: "तू इथे नसावास."त्याने आपले हात पाहिले. ते अजूनही कापत होते. तो अजुनही तोच विचार करत होता. हा भावनिक प्रतिसंवाद नव्हता; हा एक शारीरिक अनुभव होता. मशीनने केवळ डेटा कॅप्चर केला