डंपर मंगेशाच्या घरासमोर उभे राहिले. पोरे धडाधड खाली उतरली. साळवी वठारातली मंडळी रागाने बेभान झालेली. कुणीतरी तावातावाने सांगायला लागला. आम्ही समजुतीने सांगण्याचा प्रयत्न केला पण वडारानां भलतीच चरबी आहे. आमची जमात अपुरी आहे असे बघून त्यानी हाणामारीला सुरवात केली. आम्हाला शेपुट घालून माघार घ्यावी लागली. आता किती दम आहे वडारांचा तेच बघूया ! शिवरे मंडळीनी भाऊंची सुचना असतानाही ट्रक मधुन येणाऱ्या मंडळीची वाट न बघताच वडारांच्या पालावर जायचा निर्णय घेतला. हाणामारीची खुमखुमी असणारी तरणी पोरे धावतच पालांच्या दिशेने निघाली. साळवी मंडळी माघारी पळाली ती जमात करून चाल करणार हे वडारानी ओळखलेले