संतांची अमृत वाणी - नाम श्रेष्ठ..

  • 687
  • 207

                    " नाम श्रेष्ठ.. नाम श्रेष्ठ "          या मृत्यू लोकी प्रपंच्यात गुरफटलेल्या जीवाची रात्रंदिवस सुख मिळविण्यासाठी धडपड चाललेली असते. शेवटी सुख म्हणजे तरी काय ? आपल्या मनातला दुःखाचा, द्वैत संकल्पनांचा संपूर्ण काळोख नष्ट होणे म्हणजे सुखाची पहाट होणे. त्यासाठी अंतःकरणात भगवंताचं अधिष्ठान हवं. सूर्याला जवळ केल्याशिवाय अंधार कसा नष्ट होणार? सूर्य म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा उदय झाला की, काळोख नष्ट होतो. ज्ञानमार्गाने भक्तीचा कळस जवळ केला की, सुखाची बरसात व्हायला वेळ लागत नाही.पापांच्या राशींच्या राशीं जाळण्याची ताकद नाम भक्तीत आहे.त्यासाठी सर्वस्वाने भगवंताच्या चरणी निष्ठा प्रेमपूर्वक अर्पण तर करायला हवी. देहाची