कॉन्टॅक्ट लिस्ट

  • 732
  • 228

मोबाइलमधली कॉन्टॅक्ट लिस्ट समोर तर दिसते, पण नेहमीच दुर्लक्षित राहतेतंत्रज्ञानाने अनेक पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे तिच्याकडे आता म्हणावे तसे लक्ष जात नाही.आपल्याला हवा तो नंबर शोधा आणि समोरच्याला कॉल करा – एवढंच काय ते कॉन्टॅक्ट लिस्टचं काम राहिलेलं आहे.आज कितीतरी महिन्यांनी मोबाइलमधली कॉन्टॅक्ट लिस्ट चाळली, आणि मग जाणवलं –ही तर मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच चालली आहे!कधी काळी शंभर-दोनशे नंबर असणारा हा आकडा कधी 1500 च्या वर गेला, हे समजलंच नाही.त्या फुगलेल्या कॉन्टॅक्ट लिस्टकडे पाहून मनात एक विचार आला – “खरंच एवढे लोक आपले ओळखीचे आहेत का? की ही फक्त नावांची गर्दी आहे?”इंस्टाग्रामचे फॉलोअर्स किंवा यूट्यूबचे सब्स्क्राइबर्स जसे वाढत जातात,तशीच ही कॉन्टॅक्ट