दिवस दुसरा : जागर स्त्रीशक्तीचाआरे बापरे... "रात्र कशी संपली काय कळलंच नाही!" मी स्वतःशीच बडबडत उठलो.लाडक्या बाप्पांकडे पहिले तर ते आधीच उठून ध्यानमग्न बसले होते. उंदीर मामा माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता. क्षणभर मला कळलंच नाही, हा बरं का असं हसतोय? पण मी त्यावर जास्त विचार केला नाही. बाप्पांचं ध्यान मोडू नये म्हणून मी खूप काळजी घेत होतो.पण उंदीर मामा काही गप्प बसत नव्हता... दातांनी स्वतःच्याच शेपटीला चावत होता आणि चूक... चूर... असा आवाज करत होता. मी त्याला फटकारलं.पण तो काय, अजूनच हट्टाने गप्प बसायच्या मूडमध्ये नव्हता. शेवटी न राहवून त्याने मला विचारलंच,"मंडळ दादा, नैवेद्य कधी येणार?"मला खुदकन हसू