कथा : चेक… की चेक-आऊट?दुपारची वेळ होती. घरकाम आटोपून मी निवांत बसले होते. सहजच माझ्या मैत्रिणीला – नीलाला – फोन केला. नीलासोबतचा माझा संबंध वेगळाच. कॉलेजपासूनची सोबत, सुखदुःखाची सखी, एकमेकींचं बोलणं मनापासून ऐकणारी.पण आज तिचा आवाज पहिल्यासारखा नव्हता.कधीही फोन केला की ती खळखळून हसते, पाच मिनिटांतच घरातली सगळी मजा सांगते. पण आज तिचा सूर वेगळाच. जणू एखादं ओझं तिच्या आवाजाला दाबून ठेवत होतं.“काय गं, तब्येत बरी नाही का?” मी काळजीपूर्वक विचारलं.ती काही बोलली नाही.“अगं, काही प्रॉब्लेम आहे का पैशाचा? घरात काही झालंय का? की तब्येत बिघडलीये?”मी प्रश्नावर प्रश्न विचारत राहिले.शेवटी तिनं एक दीर्घ श्वास घेतला.“मन्या ग… मी सांगू का तुला