ब्रम्ह चैतन्य गोंदवलेेकर - नाम महात्म्य.

  • 1.3k
  • 345

                    नाम  महात्म्य !                          अत्यंत समाधानाची तुर्यातीत अवस्था जो संत प्राप्त करतो त्याला संत म्हणतात. असा संत जेंव्हा लोकसंग्रह करू लागतो तेंव्हा अक्षरशः हजारो जीव (मनुष्य प्राणी)आत्मज्ञानाच्या मार्गाला लागून समाधानाची अवस्था गाठतात. असे संत निर्माण होणे हे त्या समाजाचे महद्भाग्यच समजायला हवे.   श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज हे अशाच श्रेष्ठ श्रेणीतील थोर संतापैकी एक होते. भगवंतांनी गीतेत सांगितल्या प्रमाणे "जन्म कर्मच मे दिव्यम" हे वचन त्यांच्या जीवनात पदोपदी प्रत्ययास येते. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे, त्यांचा व्यवहार, त्यांची शिकवण, त्यांचे चारित्र्य