तुला माहित आहे मी खरे म्हणजे मी कधी हॉटेलमध्ये जात नाही पण तुझ्या वाढदिवसाला हॉटेलमध्ये नक्की येणार बर का....!!”तिच्याकडे बघून डोळे मिचकावत बोलणाऱ्या ऊमाकडे बघताच ..नयनाने खूष होऊन आईचा गालगुच्चा घेतला. “आणि नयन मोह्नमामाला पण फोन कर बर का आधीच ..तो तर येतोच दर वर्षी तुझ्या वाढदिवसाला ,त्याला आमंत्रण देऊन ठेव .”..आईचे बोलणे ऐकताच नयन हसली ..“आमचे फोन तर आधीच झालेत आई ..येणार आहे तो नेहेमीप्रमाणेच मला गिफ्ट काय हवे हे सुद्धा त्याने विचारून ठेवलेय मला ..”असे म्हणून खुष होऊन कपडे बदलायला आत गेली .गेली दहा वर्षे मोहन नियमित नयनाच्या वाढदिवसाला तिच्या आवडीचे गिफ्ट घेऊन येत असे .कित्येक वर्षाचे त्या दोघींच्या सोबत असलेले