पुनर्मिलन - भाग 7

(12)
  • 627
  • 267

पुढचा आठवडा खूप गडबडीत गेला .सतीशने काकूंना साडी आणि काकांना कपडे घेतले .ऊमाला चार साड्या ,एक छोटे मंगळसूत्र आणि चार बांगड्या घेतल्या .सध्या हे लहान मंगळसूत्र चालवून घे ,हळूहळू तुला आणखी दागिने करीन .असेही त्याने ऊमाला सांगितले . ऊमा खुष होती ,सतीशच्या अशा बोलण्याने ती आणखीन आनंदी झाली .अखेर हे लग्न पार पडले .सतीशचा ऑफिसमधला मित्र मोहन, रमाच्या वाड्यातील चार पाच माणसे इतकेच लोक उपस्थित होते लग्नाला .लग्नानंतर सतीशचे दोन खोल्याचे चांगले सजवलेले घर पाहून ऊमाला खुपच आनंद झाला.सतीशला थोडीच रजा मंजूर झाली होती म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी ऊमा आणि सतीश हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले .चार दिवस चांगल्या हॉटेलमध्ये त्याने बुकिंग केले होते