सकाळी सावली लवकर उठली आणि हवे असलेले कापड आणि साहित्य घेऊन ती घराचा बाहेर पडली. त्यानंतर ती थेट ऑफिसला जाऊन पोहोचली तर तीला तसे बघून सगळे विचारू लागले. तेव्हा सावलीने कुणालाही उत्तर दिले नाही आणि तीने एक अर्ज तयार केला आणि बॉसकडे ती घेऊन गेली. बॉसने लगेच संबंधित अधिकाऱ्याला सावलीला क्वार्टर देण्याचा आदेश दिला आणि सावलीला त्याच दिवशी एक क्वार्टर मिळाले. सावली ऑफिस संपल्यावर थेट त्या क्वार्टर वर रहायला गेली होती. आता सावली आपल्या योजनेला अमलात आणू शकत होती. ती आता विचार करू लागली होती तेव्हाच तीचा फोन वाजला आणि सावलीने तो फोन उचलला. समोरून आवाज आला, “ हेलो सावली