मियाँ बिबि राजी - भाग 4

  • 306
  • 99

       बादशाचे भेसूर रडणे ऐकुन मंगेशची आई-बहिण दोघी बाहेर आल्या. मंगेशच्या बहिणीने आजुबाजुला नजर टाकली. तिला काहीच अर्थबोध होईना. मग तिने बादशहाला साखळीने बांधले अन् ती पुन्हा कामाला घरात गेली. दहा पंधरा मिनिटे बादशा भीषण रडत राहीला तेव्हा मात्र काहीतरी अघटीत घडल्याची चाहुल मंगेशच्या बहिणीला लागली. घरात पुरूष मनुष्य कोणीच नव्हते. तिने मागीलदारी जाऊन शेजारच्या भाईला हाक मारली. भाई आला. भाई समोर दिसताच बादशा दोन पायांवर उभा रहात भुंकायला लागला. भाईने बादशाची साखळी हातात पकडून त्याला मोकळं केल मात्र... साखळीला ओढ देत बादशा बागेकडे निघाला.              बागेच्या गेट बाहेर सुऱ्याची बजाज सुपर भाईने ओळखली.