*पहिला दिवस – प्राणप्रतिष्ठा* आज दिवस पहिला... माझ्या बाप्पाचा... माझ्या घरातला आनंदाचा.काय म्हणालात "आनंदाचा कसा?"... अहो, आनंदी वातावरण का नसणार...? कारण माझ्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आज होणार होती. या आलौकिक सोहळ्यासाठी प्राणप्रतिष्ठेसाठी सायंकाळचा मुहूर्त ठेवण्यात आला होता.पण जेव्हा समजलं की मुहूर्त उशिरा आहे, तेव्हा थोडं मन अस्वस्थ झालं. कारण बाप्पा घरी आले होते, पण प्राणप्रतिष्ठा सायंकाळी होणार होती. आता मी दिवसभर काय करू...? बाप्पा माझ्याशी बोलणार नव्हते... मनात विचार आला आणि बेचैनी वाढली.एकीकडे माझ्या लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीचा आनंद मनात उसळून वाहत होता, तर दुसरीकडे बाप्पा घरात असूनही गप्प बसले आहेत, असं वाटत होतं.जन्मलेलं बाळ आईच्या मांडीवर झोपलेलं असतं... आई त्याला हाक मारते,