Chapter 10 : राखेतून उठणाऱ्या सावल्या झाडाखालून निघालेली सावित्री आता शांत झालय, पण झाडाच्या मुळांमध्ये अजूनही अनेक दडपलेले आवाज हालचाल करत होते. त्या झाडाच्या सावलीत – जे आता प्रियंका , चेतन आणि शंकरनाथसाठी केवळ झाड नव्हतं , तर एक उगमबिंदू बनलं होतं – आता एक नवीन गूढ उलगडायला सुरुवात झाली होती. रात्री पुन्हा प्रियंका एक विचित्र स्वप्न पाहते – ती एका अंधाऱ्या खोलीत आहे. त्या खोलीच्या मध्यभागी झाड उभं आहे. आणि झाडाभोवती अनेक स्त्रिया उभ्या आहेत – त्यांचं शरीर अस्पष्ट, धुरासारखं. त्यांच्यातली एक पुढे येते आणि प्रियंकाकडे हात वाढवते: " माझं नाव चंद्रा होतं ... मी पहिली होते... आणि