पुनर्मिलन - भाग 5

  • 1.2k
  • 552

नयनाला मात्र काही कमी पडू नये इकडे तिचा कटाक्ष असे .मनातले विचार बाजूला ठेवून ऊमाने नाश्त्यासाठी पोहे करायला घेतले .पोह्याच्या डिशमध्ये तिने नयनाला एक लाडू पण वाढला .“आई तु पण घे न एक लाडू ,कसला मस्त झालाय असे नयनाने म्हणल्यावर “नको ग सारखे ते पदार्थ करून माझी तर खायची इच्छाच  मरते बघ.असे म्हणून ऊमाने पोहे खायला सुरवात केली .खाऊन झाल्यावर नयना बाहेरच्या खोलीत गेली .तिच्या मैत्रिणीचा फोन होता त्यावर तिचे बोलणे चालू होते .ऊमाने पण सगळा आतला पसारा आवरला .थंड झालेला लाडू चिवडा डब्यातून भरून ठेवला . आणि बाहेर येऊन पेपर चाळत बसली .थोड्या वेळाने “आज जेवायला काय करू ग नयन  ?असे