पुनर्मिलन - भाग 4

  • 804
  • 407

दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ऊमाला नेहेमीप्रमाणे जाग आली .शेजारी नयना गाढ झोपली होती झोपेत तिच्या अंगावरचे पांधरूण सरकले होते .ते हाताने सारखे करीत ऊमा हळूच उठली .आणि आतल्या खोलीत जाऊन तिने मधले दार बंद करून घेतले .आज तिला बेसन लाडू आणि चिवडा करायचा होता .जसे जसे दुकानातले पदार्थ संपतील तसे ती थोड्या प्रमाणात आणि ताजेच तयार करीत असे .त्यामुळे पदार्थांची चव टिकून रहात असे .तिने स्वतःचा चहा करून घेतला आणि त्यानंतर आंघोळीला गेली .आंघोळ झाल्यावर तिने एकीकडे चिवड्याची तयारी करीत लाडूसाठी मोठ्या पातेल्यात बेसन भाजायला घेतले .बेसन भाजून झाल्यावर ते एका मोठ्या परातीत गार करीत ठेवले आणि दुसरीकडे दुसऱ्या एका मोठ्या