अनुबंध बंधनाचे. - भाग 47

  • 237
  • 63

अनुबंध बंधनाचे.....( भाग ४७ )* आज आरवशी बोलुन वैष्णवीला खरच खुप बरं वाटत होतं. त्या दोघांनी मिळुन ठरवलेल्या प्लान प्रमाणे आरव तिला स्टेशन जवळच एका ऑफिस मधे जॉब बघतो. वैष्णवीचा कॉल आल्यावर तो तिला त्याबद्दल बोलतो. ती पण त्या ऑफिस मधे जाऊन इंटरव्ह्यूव देते. तिला लगेच दुसऱ्या दिवसापासूनच जॉइन करायला सांगितले होते. आता आधीच्या ऑफिसमध्ये म्हणजे प्रेमच्या कंपनीत रिजाईन द्यावी लागणार होती. या गोष्टीचे तिला थोडं टेन्शन आले होते. कारण प्रेमला हे कळल्यावर तो काय विचार करेल. पण सांगावं तर लागणारच होतं. अखेरीस ती दुसऱ्या दिवशी ऑफिस मधे त्यांच्या बॉसला रिजाईन लेटर देते. आणि त्यांना सांगते, मी उद्यापासून ऑफिस मधे नाही येणार