3:03AM

  • 815
  • 228

शनिवार सकाळ.शहराच्या जुन्या भागात लिलाव बाजार भरलेला.लोखंडी गजांच्या आत जुनी चित्रं, फर्निचरं, मोडक्या वस्तूंचा ढीग.अमोल गर्दीतून सरकत गेला. त्याचं डोकं पुस्तकं आणि प्रोजेक्ट्समध्ये गुरफटलेलं होतं. तो एक साधा कॉलेज मुलगा होता - मध्यमवर्गीय, नेहमीच पैशांची तंगी. पण त्याला जुन्या वस्तूंचा छंद होता.आज त्याच्या नजरेत पडलं एक जुनं लाकडी घड्याळ.ओक लाकडाची चौकट, काळपट डायल, काच थोडी तडकलेली.सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे काटे उलट चालत होते.तो जवळ गेला.घड्याळाच्या काट्यांची हालचाल पाहताना त्याच्या छातीत एक अनामिक थंड लहर पसरली.टिक… टिक… टिक…पण ती टिक-टिक उलटी, मागे जाणारी.“हे कितीला?” त्याने दुकानदाराला विचारलं.दुकानदाराने हळू आवाजात उत्तर दिलं,“हे घड्याळ तुला मागे नेईल… पण काय गमावशील, हे तुला माहिती