दुकानातून निघून जाताना राजू दुकानातला कचरा आणि दुधाच्या वापरलेल्या पिशव्या कचऱ्यात टाकायला घेऊन गेला .आता लाडू ,वड्या, चिवडा असे किरकोळ कोरडे पदार्थ घेऊन जायला काही लोक येत होते .पण खरी मोठी ऑर्डर आता एक वाजता असायची .रोज एक वाजता जवळच्या एका शाळेतले सात आठ शिक्षक लोक गरम थालीपीठ खायला येत असत ,सोबत काही लाडू ,वडी सुद्धा खात .नंतर चहा तर असेच... ठरलेला रोजचाच नेम होता त्यांचा तो .आता बारापर्यंत सुजाता येणारच होती .तत्पूर्वी हळूहळू किरकोळ कामे ऊमा आटोपत राहिली . कांदा कोथिंबीर चिरणे वगैरे थालीपीठाची तयारी करीत राहिली . थोड्याच वेळात सुजाता आली ..आणि परत दोघी मिळुन कामात गर्क होऊन गेल्या यानंतर सहा कधी