पुनर्मिलन - भाग 2

  • 525
  • 1
  • 141

  ताजे घरगुती आणि चविष्ट पदार्थ असल्याने ऊमाच्या दुकानातल्या पदार्थांना लोकांची पसंती असेतिच्या पूर्वीच्या नोकरीपेक्षा या दुकानात तिला चांगल्यापैकी कमाई होत होती अर्थात दिवसभराचे कष्ट पण होतेच त्यात  … बसची घंटा वाजली आणि ऊमा चटकन भानावर आली .तिचा स्टॉप आला होता . ती पटकन उतरली आणि दुकानाच्या दिशेने निघाली.दुकानाजवळ पोचताच तिने कुलूप काढून दुकानाचे शटर उघडले .तोपर्यंत शेजारच्या दुकानातून दुधाच्या पिशव्या घेऊन शेजारच्या त्या दुकानातील नोकर राजू आला.झाडू घेऊन झाडणाऱ्या ऊमाला पाहून पिशव्या ठेवून तो पुढे झाला .“मावशी  इकडे आण तो झाडू ..मी झाडतो . असे म्हणत त्याने ऊमाच्या हातुन झाडू काढुन घेतला आणि तो स्वतः झाडू लागला .झाडताना त्याने विचारले ,मावशी आज सुजाता