रमण दरवाजा खोलून आतमध्ये आला. त्या दरवाज्याच्या आवाजाने तिला जाग आली. रमण ला आलेलं बघून ती उठून बसली. तो आतमध्ये आला. आणि कपाटातून कपडे घेऊन फ्रेश व्हायला गेला. रीता कडे तर त्याने ढुंकून ही पहिलं नाही. जणू तीच काहीच अस्तित्व नाही अस वाटत होत तिला. तो आतमध्ये गेला. तास ती विचार करत होती आता आला का मग तिच्या कपड्याचा विषय काढू अस. तिला समजत नव्हत कस बोलावं. काही वेळाने तो बाहेर आला. आणि आरश्या समोर जाऊन केसला फनी करत होता. तिने हळूच त्याला बोलण्यासाठी आवाज दिला.. स... सर ते मी... तास तो मागे वळला... ती घाबरली