मराठा आरक्षणावर विचारमंथन मराठा आरक्षण व मराठ्यांचा आरक्षणाचा लढा. नेमकं हे आरक्षण संभ्रम निर्माण करणारं आहे. संभ्रम याचा अर्थ मराठ्यांना असलेलं आरक्षण. दि. १९ फेब्रुवारी २०२४ म्हणजे शिवजयंतीच्या लगेच दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोगामार्फत, ज्याचे अध्यक्ष मा. न्या. सुनिल शुक्रे होते. त्यांच्या अहवालानुसार मराठा समाजाचा विधानसभेत ठराव मंजूर करून १०% स्वतंत्र असे MSR-SEBC आरक्षण दिले. असं असतांना जरांगे पाटीलसाहेब आम्ही ओबीसी म्हणत कायद्याची लढाई लढत आहेत. तसेच ओबीसीतील आरक्षण असलेले आम्ही कुणबीच आहोत. असाही हवाला देत आहेत. ज्यात तिनशे पन्नास जातींना फक्त सत्तावीस प्रतिशत आरक्षण आहे. आरक्षणाची ही मराठा समाजाची लढाई. ज्यात