मराठा आरक्षण सरकारची चिंता वाढली

मराठा आरक्षणाचा लढा ; सरकारची चिंता वाढली?          *मराठा आरक्षण. उद्या मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसले. त्यांनी आजपासून पाणीही घेणं बंद करायचं ठरवलं. त्यामुळं सरकारची चिंता वाढलेली आहे.*          सध्या मराठा आरक्षण एक गाजत असलेला मुद्दा आहे. तसं पाहिल्यास डॉ. बाबासाहेबांनी ज्या आरक्षणाची संविधानात तरतूद केली. ती तरतूद जातीवर आधारीत नव्हती तर ती तरतूद होती, अनेक जातीतील आजपर्यंत विशिष्ट वंचीत समजल्या जाणाऱ्या जातीच्या समुहाला. त्या जाती कामावर आधारीत होत्या. जशा चामड्याचं किंवा चामड्याशी संबंधीत कामे करणाऱ्या तत्सम जाती. ज्यांना एससी असं नाव देण्यात आलं. ज्यात महार, मांग, चांभार, मेहतर, खाटीक व इतर जातींचा समावेश