Jay Shivray mitra Mandal - 1

  • 957
  • 186

मी जय शिवराय मित्र मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र पावन भूमीत तुम्ही नेहमीच मला त्यांची आठवण होत राहील व त्यांच्याच प्रमाणे माझ्यातही जिद्द आणि विशेष गुण येतील असे मला नाव दिलात (जय शिवराय मित्र मंडळ) म्हणून मी प्रथम तुमचा सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आभारी आहे...मी जय शिवराय मित्र मंडळ बोलतोय...माझा शुभारंभ 1989 साली झाला. सुरुवातीचे माझे दिवस खूप साधे-सुधे आणि हालअपेष्टेमध्ये गेले. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते. त्यांच्या सोबतीला होती ती फक्त त्यांची महत्त्वाकांक्षा. माझा जन्म झाला त्या काळात माझ्याकडे माझे कार्यकर्ते सोडले तरी फारसे कोणाचे लक्ष नव्हते. ही चार टाळकी काय उजेड पाडणार एक दोन