अनपेक्षित - भाग 4

प्रियाचा मुड खरोखर बदलला होता .समितशी बोलताना तिच्या नजरेत खुप प्रेम दिसत होते .माहेरचे किस्से ,निधी सोबत केलेली मज्जा भरभरून सांगत होती . समितला वाटले बरे झाले ,कदाचित तिकडुन आल्यावर “फ्रेश” झाली असेल.आता आजपासुन जोडीचा खरा “संसार “सुरु झाला .पुढील महिन्यात समितच्या घरी दिल्लीला जायचे पण ठरले .  दोन तीन दिवस समित फार बिझी होता सुट्टी झाल्याने कामे पेंडिंग होती  .शिवाय परदेशातुन काही डेलिगेट्स पण आले होते .. घरून निघताना प्रियाने केलेंला चविष्ट ब्रेकफास्ट खाऊन समित कारखान्यात जात होता.प्रिया सुगरण होती चांगलीच ..!!घरी जायला पण खुप उशीर होत होता त्यामुळे प्रियाशी एकांतात भेट होत  नव्हती .  आज मात्र काही झाले तरी प्रियाची