कथा क्र.०८: गावठी स्पायडरमॅन-फटफट्या जंगलेगडबडपूर गावाचं काय वर्णन करावं! इथं रोज काही ना काही भलतंच घडत असायचं. जत्रेला बैल नाचायला ठेवले की तेच धावत सुटून उसाच्या रसाच्या गाडीत शिरायचे. लग्नात वाजेवाल्यांना “मंगलाष्टक” वाजवायला सांगितलं की ते उलट “झिंगाट” लावून वरातीला नाचायला लावायचे. आणि शाळेत मास्टर गणित शिकवत बसले की स्वतःचं उत्तर चुकवून पोरांनाच विचारायचे –“ए रे, दोन दोन चौकटीत किती होतं? मला नीट दिसत नाही!”चौकातल्या पाटीवर गावाचं बोधवाक्यसुद्धा लिहिलं होतं – “गडबड हाच आमचा बाणा!”अशा या गोंधळमय वातावरणात गावातला सगळ्यात मोठा गोंधळ मात्र एकच – फटफट्या जंगले.हा असा प्रकारचा माणूस होता की पाय आपटून चालला तरी घरं हलायची, आणि कुठे