कथा क्र.०७: पोटशुद्धी खाणावळगावाच्या चौकात रोजचं दृश्य म्हणजे भाजीवाल्याभोवती गप्पांची मैफल. कोणत्या वांगीला किडे पडले, कोणता टोमॅटो लाल झाला, आणि कोणाच्या घरातल्या बायकोने परवा किती तिखट घातलं, हे सगळं तिथंच ठरत असे. पण त्या सकाळी मात्र चौकात वेगळंच चित्र होतं. भाजीवाल्याच्या टोपल्या रिकाम्या पडल्या होत्या, लोकांनी त्याच्याकडे बघायलाही वेळ नव्हता. सगळा जमाव जमला होता एका नवीन फलकासमोर.तो फलक अगदी डोळ्यात भरणारा,जाडजूड अक्षरं,आणि चमचमतं रंगकाम केलेला होता. त्यावर लिहिलं होतं – “पोटशुद्धी खानावळ – जेवल्यावर पश्चात्ताप हमखास!” (संस्थापक: भोंद्या कडूळकर – पोटाचा उद्धारकर्ता)हे वाचून लोकं अक्षरशः पोट धरून लोळू लागले. कुणी म्हणालं, “हे खानावळ आहे की दवाखाना? नाव तर अगदी औषधाच्या