कथा क्र.०६: मैत्रीचा कॉन्ट्रॅक्टगावातल्या त्या चहा टपरीवर पांड्या आणि भिक्या रोज हजेरी लावायचे. टपरीवाल्याने त्यांच्यासाठी खास बाकडी राखून ठेवली होती. गावकऱ्यांना माहीत होतं,सकाळी पहिल्या “किटलीच्या शिट्टी”सोबतच हे दोघं येणार, आणि मग सुरू होणार गावभरातली पहिली आणि शेवटची “लोकसभा”.दोघांची मैत्री एवढी घट्ट होती की गावातल्या बायकाही थट्टा करत म्हणायच्या –“देवा, यांचं लग्न झालं असतं तर आज गावातल्या सगळ्या भांड्यांचा वाटा झाला असता!”एखादी चतुर बाई त्यावर ऑडिशन करायची –“आणि घटस्फोट झाला असता तर कोर्टातली वकिलीही बंद पडली असती, रोजचा गोंधळ बघून न्यायाधीशानेही निवृत्ती मागितली असती!”अशी ही गोड-तिखट जोडी त्या दिवशी मात्र भांडणावर आली. कारण?गावचे पाटील त्यांच्या लग्नात मोठ्ठं जेवण होतं. भात-भाजी, आमटी,