अनपेक्षित - भाग 3

  • 285
  • 123

तसे पाहायला गेले तर समितच्या स्थळात तसे काहीच आक्षेपार्ह नव्हते .आई, बाबा, आजी, आजोबा, काका ,आत्या घरच्या इतक्या सगळ्यांचे प्रियाचे मन वळवणे चालले होते निधीची ताटातूट होतेय म्हणुन प्रिया लग्नाला नाही म्हणत होती की काय असे वाटुन रिया म्हणाली ,” प्रिया थोडे दिवसात निधीसाठी पण आपण तिकडचे स्थळ पाहु मग तर झाले .”निधी आणि प्रिया यावर काहीच नाही बोलल्या .तशात खुद्द समितचे फोन प्रियाला येऊ लागले .समितच्या आर्जवाने प्रियाच्या मनात “चलबिचल” होत होती .अखेर एकदाची नाईलाजानेच प्रिया लग्नासाठी तयार झाली!!निधीला हे बिलकुल पटले नाही पण सद्य परिस्थितीत काहीच उपाय तिला सुचत नव्हता .सुदीपच्या लग्नासाठी समितच्या सोबत त्याच्या घरचे लोक पण आले होते