भाग ५ मिशन कंप्लीट लोकांनी शरदला उठवलं.पॅन्ट एका पायावर फाटली होती, आणि शर्ट बाही वर फाटला होता. पायाला आणि हाताला चांगलंच खरचटलं होतं आणि थोडं थोडं रक्त वाहत होतं. लोकांनी त्याला चालवत बसस्टॉप वर नेऊन बसवलं. एकाने त्यांची बाइक रस्त्याच्या कडेला लावली. “अरे बापरे, तुम्हाला तर बरंच लागलं आहे. लगेच डॉक्टर कडे जायला पाहिजे.” – क्षिप्रा. शरदने पायाची आणि हाताची जखम पाहिली, आणि म्हणाला, “नाही काही खास नाहीये. थोडं खरचटलं आहे इतकंच. गाडी हळू होती म्हणून जास्त लागलं नाही. तुम्ही काळजी करू नका.” – शरद. इतक्यात बस आली आणि शरदला फारसं लागलेलं नाही हे बघून, बाकी सर्व लोकं बस मधून