************************** ११ स्नेहल आज जगात नव्हती. ती गेल्यापासून स्वानंद नेहमी निराश असायचा. त्याच्या जीवनात आनंद नसायचाच. ती वृद्धाश्रमाची पायरी. त्या पायरीवर बसून स्वानंद नित्यनेमानं विचार करीत असायचा. आपण कोणतं पाप केलं असेल की आपल्याला वृद्धाश्रम मिळालं. त्यातच त्याला आठवण यायची स्नेहलची. जी आज अजिबात जीवंत नव्हती. तशीच त्याला आठवण यायची ती त्याच्या मुलांची. कधी मुलगा भेटायला येईल असं सारखं वाटायचं. त्यातच त्याला बंधनही होतं. ते बंधन म्हणजे त्याला स्वतःचे निर्णय घेवून परवानगी न घेता फिरायला कुठेही जाता येत नसे.