कथा क्र.०५: बायकोचा मेकअपमाझं नाव गोट्या सावळे. गावात मला कुणी नावानं नाही हाक मारत, सगळे “गोट्या फजित्या” म्हणूनच ओरडतात. कारण माझं आयुष्य म्हणजे रोजचा नवा तमाशा, आणि त्यातली मुख्य नायिका म्हणजे माझी बायको. माझ्या घरातली कायमची नाटक कंपनी.आता ही बाई नेहमी एकच गप्पा मारते —“मी अजूनही कॉलेज मुलगी दिसते हो!”मी लगेच उडवतो —“अगं, कॉलेजचं नाही, तू आता गावच्या शाळेचं playground दिसतेस."ते ऐकताच ती डोळे वटारते, कमरेवर हात ठेवते आणि full heroइन मोडमध्ये म्हणते —“तुला काय कळतं? शिल्पा शेट्टी बघ, दोन मुलं असूनही धडधाकट झकास दिसते!”मी हळू आवाजात पुटपुटलो —“हो गं, पण तिचा नवरा राज कुंद्रा आहे…आणि माझा प्रकार राज कुंडकर