भाग ४ योगायोग अचानक भेटींचा. “तुमच्या बरोबर बाइक वरुन? पाऊस किती पडतो आहे बघितलं का? बाइक वर मी भिजणार नाही का?” – क्षिप्रा. शरद हिरमुसला झाला. एक चान्स वाया गेला. पावसाला सुद्धा आत्ताच पडायचं होतं. “हां हे माझ्या लक्षातच आलं नाही. ओके तुम्ही बसने जाणंच बरोबर आहे. ओके देन बाय.” आणि त्याने बाइक चालू केली. – शरद. “एक मिनिट, तुम्ही रेन कोट वापरत नाही का? पार भिजून गेला आहात. बायको चीड चीड करणार घरी गेल्यावर.” – क्षिप्रा. “ती असती तर नक्कीच चिडली असती. पण आता ती या जगात नाहीये. त्यामुळे त्या आघाडीवर शांतता आहे.” – शरद. क्षिप्राचा चेहरा