भाग ३ शरद, क्षिप्रा आणि बसस्टॉप आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू झालं होतं. आता घरी वाट पाहणारं कोणीच नव्हतं, त्यामुळे लवकर घरी जाण्याचा काही प्रश्न नव्हता. शरदने कामात स्वत:ला झोकून दिलं. शरदने व्हेंडर डेव्हलपमेंट मध्ये इतका रिसर्च केला आणि त्यानुसार नवीन व्हेंडर शोधले. कंपनीचा त्यामुळे भरपूर पैसा वाचला. त्याच्या कामावर खुश होऊन त्याला नाशिक च्या फॅक्टरी मध्ये परचेस मॅनेजर असं प्रमोशन देऊन नाशिकला पाठवलं. शरदची नाशिकला ट्रान्सफर होऊन आता चार महीने झाले होते. इतकी वर्ष त्याला मुंबईला ऑफिस मधे कामाची सवय होती पण आता तो फॅक्टरी मधे परचेस मॅनेजर होता. फॅक्टरीची संस्कृति जरा वेगळी असते. पण आता चार महिन्यात तो सरावला